⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

दसऱ्याला खरेदीची सुवर्णसंधी! सोने-चांदीच्या कितमीत घसरण, पहा नवीन दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२३ । आज साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी (Gold Silver Rate) खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती असते. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. सोने २०० रुपये प्रति तोळ्याने तर चांदीचा दर ५०० रुपये प्रति किलोने घसरले आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याचा दर घसरून ५६ हजाराच्या खाली आला होता. दुसरीकडे चांदीचा दर देखील ६९ हजारावर आला होता. यामुळे सोने आणि चांदीचा दर ७ महिन्याच्या नीच्चांकीवर पोहोचला होता. दसरा-दिवाळीपर्यंत दर आणखी खाली जाणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र इस्त्राईल आणि हमास यांच्यात युद्ध झाल्याने दोन्ही धातूंच्या किमतीनीपुन्हा मोठी उसळी घेतली.

जळगावमधील सोने चांदीचा दर
जळगावमध्ये सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ५६,६२० रुपये प्रति तोळा आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ६१,८०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर ७४००० रुपये प्रति किलोवर गेला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या दराशी यंदाच्या दराची तुलना केली तर सोने प्रति तोळ्यामागे सुमारे ९००० रुपयांनी महागले आहे. गेल्या वर्षी सोन्याचा दर ५१९०० रुपये प्रति तोळ्यावर होता. मागणीत वाढ, युद्धाचा परिमाण, आगामी काळात दरवाढीचा अंदाज असल्याने ही दरवाढ झाल्याचा अंदाज आहे