Gold Silver Today : सोने-चांदी आणखी स्वस्त ; घ्या जाणून आजचा प्रति ग्रॅमचा भाव
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लगेच करा. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. आज झालेल्या घसरणीनंतर सोने पुन्हा ५२ हजाराखाली आले आहे. तर चांदीच्या भावात देखील मोठी घसरण झाल्यामुळे चांदीचा प्रति किलोचा दर ६० हजाराच्या घरात आला आहे.
आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी जळगाव सराफ बाजारात सोने १४० रुपयाने स्वस्त झाले आहे. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,७८० रुपये इतका खाली आला. आज चांदीच्या भावात तब्बल १२७० रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे आता एक किलो चांदीचा भाव ६०,९०० रुपये इतका खाली आला आहे. कालच्या सत्रात चांदी २०० रुपयांनी स्वस्त झाली होती.
तुमच्या माहितीसाठी सोन्या-चांदीचे दर दिवसातून दोन वेळा बदलतात आणि त्यानुसार सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव बदलतात. या बदलासह नवीन किंमतीत बाजारात सोन्या-चांदीची विक्री होते.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आलीय. पाच दिवसात सोने जवळपास ५०० रुपयांनी घसरले आहे. तर चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आलीय. पाच दिवसात चांदीच्या भावात जवळपास २००० ते २२०० रुपयाची घसरण दिसून आली.
या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
२० जून २०२२- रुपये ५२,०३० प्रति १० ग्रॅम
२१ जून २०२२ – रुपये ५१,९२० प्रति १० ग्रॅम
२२ जून २०२२ – रु ५१,९२० प्रति १० ग्रॅम
या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
२० जून २०२२- रुपये ६२,३७० प्रति किलो
२१ जून २०२२ – रुपये ६२, १७० प्रति किलो
२२ जून मे २०२२- रुपये ६२,०७० प्रति किलो
अशी करण्यात येते शुद्धतेची तपासणी
ज्वेलरी शुद्धता तपासण्यासाठी एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमॉर्कशीसंबंधित अनेक गोष्टी चिन्हांकित असतात. या चिन्हांच्या माध्यमातून दागिन्यांच्या शुद्धतेची ओळख ठरवली जाते. यामध्ये एक कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता ठरवण्यात येते.
22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 916 चिन्हांकित करण्यात येते
21 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 875 चिन्हांकित असते
18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी 750 लिहलेले असते
14 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 585 चिन्हांकन असते