---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

सोन्याच्या दरात मोठी उसळी : काही तासात झाली 1100 रुपयांनी वाढ, चांदीही वाढली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२३ । गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीत (Gold Silver Rate) प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोन्या-चांदीचे भाव कुठे थांबतील याबाबत काहीही सांगणे घाईचे आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच सोन्यात (Gold Rate) विक्रमी घसरण आणि तेजी या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. दरम्यान, गुडीपाडव्याला सोन्यासोबतच चांदीच्या किमतीत घसरण झाली होती. मात्र आज सकाळी सोन्याच्या किमतीत एक हजाराहून अधिक रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीची (Silver Rate) महागली आहे.

gold silver 2 jpg webp webp

आजचा जळगाव सुवर्णनगरीतील सोन्याचा दर
जळगाव सुवर्णनगरीत आज गुरुवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५९,५०० रुपायांवर गेला आहे. यापूर्वी गुडीपाडव्याच्या दिवशी सकाळी सोन्याचा दर ५८,४०० रुपये प्रति तोळा इतका होता. मात्र त्यात काही तासात तब्बल ११०० रुपयाची मोठी वाढ झालेली आहे. येत्या काळात सोने 65,000 रुपयांचा विक्रम करू शकते, असे बाजारातील तज्ज्ञ सांगत आहे. फेब्रुवारीअखेर सोने ५५ हजार रुपयांपर्यंत खाली आले होते. पण आता पुन्हा ते ५९,००० हजारांवर गेले आहे. म्हणजेच तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत सोन्याने ४०००-४५०० रुपयांपर्यंत व्यवहार केले आहेत.

---Advertisement---

आजचा चांदीचा दर
दुसरीकडे आज चांदीचा एक किलोचा दर ६९,८०० रुपये इतका आहे. यापूर्वी काल बुधवारी सकाळी चांदीचा दर ६९००० रुपये इतका होता. म्हणजेच त्यात ८०० रुपयाची वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चांदीच्याही दरात तेजी पाहायला मिळतेय. फेब्रुवारीअखेर ६२ हजारांवर आलेला चांदीचा दर पुन्हा ७० हजाराच्या जवळ गेला आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा दर?

रुवारी, मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदी दोन्ही दरात वाढ झाली. गुरुवारी सकाळी सोन्याचा भाव 464 रुपयांच्या वाढीसह 59220 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​होता. त्याचप्रमाणे चांदीचा भावही 457 रुपयांनी चढून 69766 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे. याआधी बुधवारी सोन्याचा भाव 58756 रुपयांवर तर चांदीचा भाव 69309 रुपयांवर बंद झाला होता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---