⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | स्वस्तात खरेदी संधी ; दहा दिवसात सोन्याच्या किमतीत 1400 रुपयांची घसरण

स्वस्तात खरेदी संधी ; दहा दिवसात सोन्याच्या किमतीत 1400 रुपयांची घसरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । तुम्ही जर सोने (Gold Price) खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मागील गेल्या दहा दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. जळगाव (Jalgaon) सराफ बाजारात दहा दिवसांपूर्वी सोने ५२ हजार ५०० रुपये ताेळा (१० ग्रॅम) हाेते. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी हे दर ५१ हजार १०० रुपयांवर आले. तर दुसरीकडे चांदीचा (Silver Price) प्रति किलोचा दर ५६,५०० रुपयावर आला आहे. Gold Silver Rate Today

अर्थात, गेल्या दहा दिवसांत सोने १४०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. जगभरातील व्याजदरात सातत्याने हाेणारी वाढ आणि डाॅलर मजबूत झाल्याचा थेट परिणाम साेन्यावर झाला असल्याचे जळगावातील सराफा व्यवसायातील तज्ञांकडून सांगितले जाते आहे. गेल्या दोन वर्षात साेन्याच्या दरात सातत्याने दरवाढ झाल्याचे पहायला मिळाले. कोरोनाच्या लॉकडाऊन दरम्यान ऑगस्ट २०२० मध्ये सोने ५६,२०० रुपये प्रतीताेळा या उच्चांकी दरापर्यंत पाेहचले हाेते. त्यानंतर घसरण झाली होती.

मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) सोन्याचे भाव पुन्हा गडगडले होते. मार्चमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ५५,५०० रुपये प्रति तोळ्यावर गेला होता. मात्र त्यांनतर पुन्हा सोने दरात घसरण झालेली दिसून आलीय. गेल्या पाच महिन्यात सोन्याच्या भावात जवळपास ४५०० रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे.

गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रचंड घसरले आहे आणि देशांतर्गत किंमतीत ही घसरण पहायला मिळेल. मागील काही दिवसापासून सोन्याचे दर घसरत आहे. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देखील सोने दरात 30 रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,345 रुपये प्रति तोळ्यावर आला आहे. तर दुसरीकडे एमसीएक्सवर चांदीचा भाव सकाळी 76 रुपयांनी घसरून 55,335 रुपये प्रति किलो झाला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.