⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ, वाचा आजचे भाव

सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ, वाचा आजचे भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२१ । जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदी मधील घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज चांदीच्या भावात देखील वाढ झाली आहे.

आज (२२ सप्टेंबर) जळगाव सराफ बाजार पेठेमध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत ३७० रुपयाने महागली आहे. तर दुसरीकडे चांदी प्रति किलो ८५० रुपयाने महागली  आहे. त्यापूर्वी काल १० ग्रॅम सोन्याची किंमत ३०० रुपयाने महागली होती. तर चांदी प्रति किलो ३९० रुपयाने घसरली होती.

आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात (२२सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,७३० रुपये इतका आहे. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे ६१,८६० रुपये इतका आहे.

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण दिसून आली. जळगाव सराफ बाजारात देखील मोठी घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यात प्रति १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत १४५० रुपयाची घसरण झाली. तर चांदीच्या भावात ३४८० रुपयाची घसरण दिसून आली.

दरम्यान, जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी (२० सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,०६० होते. तर मंगळावारी (२१ सप्टेंबर) वाढ होऊन २४ कॅरेट सोन्याचे दर ४७,३६० होते. तर आज बुधवारी (२२सप्टेंबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४७,७३० रुपये इतका आहे. गेल्या दोन दिवसात प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात ६७० रुपयाची वाढ झाली आहे.

तर दुसरीकडे चांदीच्या भावात मात्र, मोठी घसरण दिसून आली. गेल्या दोन दिवसात चांदीच्या भावात १५०० रुपयाची घसरण झाली. सोमवारी (२० सप्टेंबर) चांदीच्या प्रति किलोचा भाव ६१,४०० रुपये इतका होता. तर मंगळावारी (२१ सप्टेंबर) ६१,०१० इतका होता. परंतु त्यात आज वाढ झाल्याने चांदीचा आजचा प्रति किलोचा भाव ६१,८६० रुपये इतका झाला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. सध्या सोने ४७,७३० रुपयांवर आले आहे, म्हणजेच गेल्या 1 वर्षात सोने ८,४७० रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची सर्वकालीन उच्च पातळी ७९,९८० रुपये प्रति किलो आहे. त्यानुसार, चांदीदेखील १८ हजाराहून अधिक रुपयाने स्वस्त झाली आहे.

दरम्यान, सणाचा हंगाम सुरू झाला आहे. तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विक्रमी नोंद असलेल्या सोने दरात मोठी घसरण झाली आहे.

‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं
सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढंच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोनं साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.