⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

घसरणीनंतर सोने पुन्हा महागले ; आता इतका आहे प्रति 10 ग्रॅमचा भाव?

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२४ । अनेक देशांवर मंदीचे सावट असून याचे पडसाद सध्या भारतीय सराफा बाजारावर दिसून येत असून सोने आणि चांदीच्या कितमीत सातत्याने चढउताराचे सत्र दिसून येत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूत दरवाढ दिसून आली. यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव पुन्हा 63 हजाराच्या दिशेने जात आहे.

गेल्या आठवड्यात घसरण झाल्याने सोन्याचा दर ६२ हजाराजवळ आला होता. मात्र त्यानंतर काही सत्रात दरवाढ झाली. गेल्या आठवड्यात सोने स्वस्त झाले. तर आठवड्याच्या अखेरीस सोने चमकले. 16 फेब्रुवारी रोजी 200 तर 17 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांची वाढ झाली. तर 19 फेब्रुवारी रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. 20 फेब्रुवारी रोजी भाव 100 रुपयांनी कमी झाला. 21 फेब्रुवारी रोजी सोने 250 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने विनाजीएसटी 57,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 62,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीही महागली
चांदीत गेल्या काही दिवसांपासून चढउताराचे सत्र आहे. 16 फेब्रुवारी रोजी 1100 तर 17 फेब्रुवारी रोजी 900 रुपयांनी चांदी महागली. या आठवड्याच्या सुरुवातीला 20 फेब्रुवारी रोजी चांदीत वाढ दिसून आली. सध्या चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 72,500 रुपयांवर आला आहे.