---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

वर्षभरात सोनं 10,000 रुपयांनी महागलं : आज अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव काय? पहा ..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२३ । आज देशभरात अक्षय्य तृतीयेचा सण साजरा होणार आहे. अक्षय तृतीया लोक सोने खरेदी करणे शुभ मानतात. एवढेच नाही तर सध्या लग्नसराईचा हंगामही सुरू असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे. जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी आजचे दर काय आहेत ते तपासून घ्या.. Gold Silver Rate Today

gold silver 1 jpg webp webp

अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं-चांदी खरेदी करण्याचा कल अधिक असतो. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या (Gold) भावात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यंदा सोन्याच्या किमतीने अडीच वर्षाचा रेकॉर्ड मोडीत काढत नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या वर्षी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 50 हजारांवर होता. तो आता 60 हजारावर गेला आहे.

---Advertisement---

आजचा सोन्याचा भाव?
जळगाव सुवर्ण नगरीत आज 24 कॅरेट सोन्याचा एक तोळ्याचा भाव 60,900 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. गेल्या आठवड्यात 61 हजारांवर गेलेला सोन्याचा दर या आठवड्यात 61 हजाराखाली राहिला. त्यात मागील चार पाच दिवसात काही जास्त बदल झालेला नाहीय. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 17 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव 60,800 रुपयापर्यंत होता. 

मात्र, गेल्या वर्षी बाजारात सोन्याचा भाव 50 हजार रुपयावर होता. त्यात आतापर्यंत 10,000 हजार रूपाची वाढ झाली. तसेच देशांतर्गत बाजारात यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपये पर्यंत उच्चांकी दर गाठला होता. मात्र आता अडीच वर्षाचा रेकॉर्ड मोडीत काढत सोन्याने 61 हजारापर्यंत मजल मारली. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे.

दुसरीकडे चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सध्या एक किलो चांदीचा दर 75,800 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. तो काल सकाळीपर्यंत 75,000 रुपये (विना जीएसटी) किलो इतका होता. म्हणजेच एकाच दिवसात चांदीच्या किमतीत तब्बल 800 रुपयाची वाढ झाली आहे. चांदीच्या बद्दल बोलायचं झालं तर एका महिन्यात चांदीच्या किमतीत जवळपास 6000 ते 7000 हजार रुपयाची वाढ झालेली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---