---Advertisement---
बातम्या वाणिज्य

Gold Silver : ग्राहकांसाठी खुशखबर ! आज सोने चांदीचा भाव घसरला, नवे दर जाणून घ्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२५ । मौल्यवान धातुंच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहे. देशांतर्गत सराफ बाजारात सोन्याबरोबरच चांदी दराने विक्रमी उच्चांक गाठला असून यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे गणित बिघडले आहे. मात्र आज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज २७० रुपयांनी तर चांदी ६२० रुपयांनी घसरले आहेत.

gold silver jpg webp

आज काय आहेत सोने चांदीचे भाव?
आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८८, ८६० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८१,४४६ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९९१ रुपये आहे, तर आज १ किलो चांदीचा दर ९९,०१० रुपये झाला आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत सोन्या- चांदीच्या घसरण झाली आहे.

---Advertisement---

जळगावच्या सुवर्णनगरीतील दर?
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आक्रमक भूमिकेमुळे गेल्या काही दिवसापासून जागतिक बाजारात अस्थिरता दिसून येत असून त्यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित म्हणून सोन्याकडे मोर्चा वळविला आहे. परिणामी जळगावच्या शहरातील सुवर्ण बाजारात सोने, चांदीच्या दराने उच्चांक गाठल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या जळगावात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दर ८९,२०० रुपयावर तर चांदीचा एक किलोचा दर १०,१००० रुपये इतका आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment