जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२३ । अक्षय्य तृतीया सारखा सण अवघ्यादोन दिवसांवर आला आहे. अनेक जण या दिवशी सोने-चांदीची (Gold Silver) खरेदी शुभ मानतात. मात्र याच दरम्यान सोने आणि चांदीच्या किमतीने ग्राहकांना घाम फोडला आहे. कालच्या झालेल्या घसरणीनंतर आज 20 एप्रिल रोजी, गुरुवारी या मौल्यवान धातूची किंमत किंचित वधरली. त्यामुळे अक्षय तृतीयाला ग्राहकांना सोने खरेदीसाठी अधिक रक्कम मोजावी लागण्याची शक्यता आहे. Gold Silver Rate Today
आजचा भाव काय
गुडरिटर्न्सनुसार, 20 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 10 रुपयांची वाढ झाली. 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 56,210 रुपये मोजावे लागतील. तर 24 कॅरेट एक तोळ्याचा भाव 10 रुपयांनी वधारला. आज सकाळच्या सत्रात हा भाव 61,320 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या किंमतीत 810 रुपयांची घसरण झाली होती. तरीही सध्या सोने 800 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.
चांदीत 200 रुपयांची वाढ
आज, 20 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात चांदीचा भाव अपडेट झाला नाही. काल संध्याकाळी चांदीचा भाव 77,600 रुपये होता. चांदी 14 जानेवारी संध्याकाळी 79,600 रुपये किलो होती. यामध्ये शनिवारी 1100 रुपयांची घसरण होऊन भाव 78,500 रुपये किलो झाला. रविवारी आणि सोमवारी हाच भाव कायम होता. चांदीत 200 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते. चांदीने जानेवारी ते मार्च महिन्यात 12 टक्के परतावा दिला आहे.
जळगावातील दर
जळगावात सध्या 24 कॅरेट एक तोळ्याचा भाव 60,700 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. दुसरीकडे जळगावमध्ये चांदीच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. 75,800 रुपये किलो पर्यंतची असलेली चांदी आता 75,100 रुपयावर आली आहे.