⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

ग्राहकांना पुन्हा झटका! वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदी महागली ; पहा आताचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२४ । गेल्या वर्षभरात सोने-चांदीने ग्राहकांना धक्का दिला असला तरी गुंतवणूकदारांना मात्र जोरदार फायदा झाला आहे. एकाच वर्षात सोने प्रतितोळा 8779 रुपयांनी तर चांदी प्रतिकिलाेत 7200 रुपयांची वाढ झाली आहे. दोन्ही धातूंच्या दरात झालेल्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसली. नवीन वर्षात सोने आणि चांदीचा कल काय असणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. मात्र भारतीय सराफा बाजारात पुन्हा एकदा तेजीचा कल पाहायला मिळत आहे. Gold Silver Rate 2 January 2024

आज वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (२ जानेवारी) सोन्यासह चांदीच्या भावात वाढ झाली. सोन्याच्या दरात 120 रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरात 220 रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर देशात 22 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 58,328 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 63,630 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचवेळी चांदीचा भाव महागला असून तो विनाजीएसटी 74,700 रुपये किलोवर पोहोचला आहे.

MCXवरील सोने चांदीचा दर
आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोने 0.20 टक्क्यांनी म्हणजेच 125 रुपयांच्या वाढीसह 63,445 च्या पातळीवर ट्रेंड करत आहे. तर चांदीची किंमत 0.36 टक्क्यांनी वाढून 269 रुपये प्रति किलो 74,659 रुपये आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील दर
22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 58,400 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे. तर येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 63,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. चांदीचा भाव 75000 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.