⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | बजेटनंतर सोन्याने ओलांडला 58 हजाराचा टप्पा; चांदीनेही.. आज जळगावात 10 ग्रॅमचा भाव किती?

बजेटनंतर सोन्याने ओलांडला 58 हजाराचा टप्पा; चांदीनेही.. आज जळगावात 10 ग्रॅमचा भाव किती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२३ । तुम्ही जर आज सोने (Gold Rate) आणि चांदी (Silver Rate) खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक दुःखद बातमी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या दिवशीच भारतीय सराफ बाजारात सोन्याने उच्चांकी दर गाठला आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. Gold Silver Rate Today

या झालेल्या दरवाढीमुळे जळगावात सोन्याने तब्बल 58 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदी देखील 72 हजारांवर गेली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याचा भाव 1000 रुपयांनी वधारला, तर दुसरीकडे चांदीचा भाव देखील जवळपास 2000 रुपयांनी वाढला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.

आजचा सोने दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा भाव 600 रुपयांनी वाढला. त्यामुळे सोने 58,550 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्यापूर्वी सोन्याचा भाव सोन्याचे भाव 1,090 रुपयांनी वाढून 57,942 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.

आजचा चांदीचा दर?
सोबतच एमसीएक्सवर चांदीच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आज चांदी तब्बल 1411 रुपयांनी वाधरली आहे. त्यामुळे चांदी 71,274 रुपये प्रति किलोने व्यवहार करत आहे. यापूर्वी काल चांदीचा भाव तब्बल 1,947 रुपयांनी वाढला होता. त्यामुळे चांदीचा भाव 67,950 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

काय आहेत जळगावात आजचा भाव?
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या किमतीने नवीन उच्चांक गाठला आहे. सध्या जळगावात 22 कॅरेट सोन्याचा जवळपास 53,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा जवळपास 58,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. चांदी प्रति किलो 72 हजार रुपयावर गेली आहे. दरम्यान, 10 दिवस यापूर्वी 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,300 रुपये प्रति ग्रॅम इतका होता. तेव्हापासून आतापर्यंत सोने जवळपास 1500 रुपयांहून अधिकने वाढले आहे. दुसरीकडे चांदी देखील तब्बल 3000 हजार रुपयांहून अधिकने वाधरली आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.