जळगाव लाईव्ह न्यूज । १९ सप्टेंबर २०२३ । सोने आणि चांदीच्या (Gold Silver) भावात सातत्याने बदल होताना दिसतोय. जागतिक बाजारात वातावरण अनुकूल नसले तरी सणा-सुदीत मागणी वाढल्याने भावात वाढीचे सत्र दिसून येते. 15 सप्टेंबरपासून सोने-चांदीत दरवाढ दिसून येत असल्यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला आहे. दरम्यान, आज १९ सप्टेंबरपासून गणेत्सवाला सुरुवात होत आहे. बाप्पाच्या आगमनाला जर तुम्ही सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर त्याआधी आजचे नवीनतम दर तपासून घराबाहेर पडा. Gold Silver Rate Today
भारतीय सराफा बाजार सतत हिरव्या चिन्हाच्या वर जात आहे. सोमवारीही सराफा बाजार हिरव्या चिन्हाने उघडला आणि वाढीसह बंद झाला. सोमवारी सोन्याचा भाव (22 कॅरेट) 110 रुपयांनी वाढला, तर 24 कॅरेट सोने 120 रुपयांनी महागले. तर सोमवारी चांदीच्या दरात 230 रुपयांची वाढ झाली. यानंतर भारतात 22 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 54,533 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.
त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,490 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. देशात चांदीचा भाव 72,550 रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर सोन्याचा भाव सोमवारी 0.41 टक्क्यांनी वाढून 239 रुपये झाला आणि 59,232 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला. त्याच वेळी, चांदीची किंमत 0.60 टक्क्यांनी वाढली म्हणजे 431 रुपये आणि 72,585 रुपये प्रति किलोवर पोहोचली.
दरम्यान, आज गणेश चतुर्थी निमित्त बाजारात बंद आहे. त्यामुळे आज दर जाहीर होणार नाही.
जळगावमध्ये सोन्या-चांदीच्या किमती किती आहेत?
सुवर्णनगरी म्ह्णून ओळख असलेल्या जळगावात 22 कॅरेट सोने 54,340 रुपये प्रति दहा ग्रॅम दराने उपलब्ध आहे. तर 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 59,280 रुपयांवर पोहोचले आहे. येथील चांदीचा भाव 72,290 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मुंबईत सोनं (22 कॅरेट) 54,432 रुपये आणि 24 कॅरेट सोनं 59,380 रुपये प्रति दहा ग्रॅमला विकलं जात आहे. मुंबईत चांदीचा भाव 72,420 रुपये किलोवर पोहोचला आहे.