बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

घसरणीनंतर सोने-चांदीच्या किंमतीत मोठी उसळी ; आता कुठवर पोहोचला दर? पहा

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२३ । जागतिक घडामोडींचे परिणाम सोने-चांदीवर दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. मात्र, काल बुधवारी सोने-चांदीच्या किंमतींनी पुन्हा उसळी घेतली. दोन्ही मौल्यवान धातू दसऱ्याला दरवाढीचा मुहूर्त गाठण्याची शक्यता आहे. Gold Silver Rate Today

काय आहे सोन्याचा भाव?
गुडरिटर्न्सनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीचे दोन दिवस भावात घसरण दिसली. 16 ऑक्टोबर रोजी सोने 340 रुपयांनी उतरले. तर 17 ऑक्टोबर रोजी सोन्यात 160 रुपयांची घसरण झाली. 18 ऑक्टोबर रोजी सोने 540 रुपयांनी वधारले. 22 कॅरेट सोने 55,610 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या आठवड्यात सोन्यात घसरण कायम राहिल्यास ग्राहकांचा दसरा हसरा होईल.

चांदीचा भाव काय
या आठवड्यात सुरुवातीला चांदीत घसरण दिसून आली. चांदीने नरमाईचे धोरण स्वीकारले. 17 ऑक्टोबरला चांदीत 500 रुपयांनी उतरली. त्यापूर्वी भाव जैसे थे होते. बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी किंमतींनी एक हजार रुपयांची उसळी मारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,600 रुपये आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजेवरील दर
आज गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजेसवर सोने आणि चांदीचा दर लाल चिन्हाने व्यवहार करत आहे. सोन्याचा दर 188 रुपयांनी घसरून 59,885 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा दर किंचित 80 रुपयांनी घसरून 71,815 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत आहे.