⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

सोने 1200 रुपयांने, तर चांदीत 4100 रुपयांची वाढ ; पहा या आठवड्यातील दर..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२३ । सराफा बाजारात सोने-चांदीने हा आठवडा गाजवला असून मौल्यवान धातूंनी पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली. दिवाळीनंतर सोने-चांदीत मोठी दरवाढ दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. या लांब उडीनंतर सोने-चांदीच्या किंमतीत थोडी घसरण झाली. सोन्याने या आठवड्यात 1200 रुपयांची तर चांदीने 4100 रुपयांची मोठी झेप घेतली. Gold Silver Rate Today

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर सात महिन्याच्या निच्चांकीवर आला होता. त्यादरम्यान, सोन्याचा भाव ५७ च्या घरात आला होता. तर चांदीचा दर देखील घसरून ६८ हजाराच्या घरात आला होता. त्यामुळे दिवाळीपर्यंत दोन्ही धातूंचे दर आणखी घसरण असा अंदाज लावला जात होता. मात्र जागतिक घडामोडीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी उसळी घेतली.

ऐन सणासुदीच्या तोंडावर सोन्यासह चांदीच्या किमती वाढ दिसून आली. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातील सोने-चांदीने मोठी उसळी घेतली नाही. पण महिन्याच्या मध्यावर दिवाळीत दरवाढ झाली. धनत्रयोदशी आणि दिवाळी पाडव्याला किंमतीत वाढ झाली असली तरी या मुहूर्तावर जोरदार खरेदी झाली. राज्यातील सर्वच शहरातील सराफा बाजारात दिवाळीत ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

सोन्याचा दर असा
या आठवड्यात 13 नोव्हेंबर रोजी सोने 100 रुपयांनी घसरले. 14 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 110 रुपयांनी वाढला. 15 नोव्हेंबर 400 रुपयांनी भाव वाढले. 17 नोव्हेंबर रोजी सोने 600 रुपयांची उसळी घेतली. 18 नोव्हेंबर रोजी त्यात 50 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा दर
या आठवड्यात चांदीने जोरदार मुसंडी मारली. 13 नोव्हेंबर रोजी किंमती 600 रुपयांनी घसरल्या. 15 नोव्हेंबर रोजी चांदीने 600 रुपयांची वाढ नोंदवली. 15 नोव्हेंबर रोजी किंमती थेट 1700 रुपयांनी वधारल्या. तर 16 नोव्हेंबर रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. 17 नोव्हेंबर रोजी चांदीच्या किंमतीत 1500 रुपयांची वाढ झाली. 18 नोव्हेंबर रोजी किंमतीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.