---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

आजचा सोने-चांदीचा दर : १९ जुलै २०२१

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जुलै २०२१ । मागील गेल्या आठवड्यात जळगाव सुवर्णबाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ उतार दिसून आला. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदी दर स्थिर आहे. त्यापूर्वी काल रविवारी मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले होते.

gold silver 5

काल २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत २५० रुपयांनी तर २४ कॅरेट सोन्याचा भाव २६० रुपयांनी घट झाली होती. तर चांदी प्रति किलो १५०० रुपयाने स्वस्त झाल्याचे पाहायला मिळाले होते.

---Advertisement---

लग्नसराई जवळपास संपल्याने स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अस्थिर व्हायला सुरुवात झाली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीच पासून सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होऊ लागली. 

मागील वर्षी देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय. लॉकडाऊनमुळे सराफ बाजार बंद असल्याने ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने प्रती १० ग्रॅमसाठी ५६ हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. तर चांदीच्या दराने देखील ७० हजाराचा टप्पा गाठला होता.

त्यानंतर बाजारपेठ खुली होऊ लागल्याने सोन्याच्या दरात हळूहळू घट झाली. सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास ७ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.  येत्या काळात सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. 

आजचा सोन्याचा दर

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८४९ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,४९० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम १ ग्रॅम चा दर ४६१८ रुपये असून १० ग्रॅमचा सोन्याचा भाव ४६,१८० रुपये आहे.

चांदीचा भाव

आज चांदी १५०० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा भाव ७३,२०० रुपये इतका आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---