⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

ग्राहकांना दिलासा ! आज सोने-चांदीच्या दरात झाला बदल.. तपासून घ्या नवे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२४ । मार्च दरम्यान सोने आणि चांदीने मोठी घौडदौड केली. या महिन्यात सोन्याच्या वाढत्या किमतीने ग्राहकांना घाम फोडला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी सोन्याचा दर ६६ हजार रुपयांवर गेला. दुसरीकडे चांदीने देखील मोठी उसळी घेत ७६००० हजार रुपयाचा टप्पा गाठला. मात्र आता दोन्ही धातूंच्या किमतीत बदल झालेला दिसून आला.

जळगावच्या सराफ बाजारात गेल्या आठवड्यात व्यवहाराच्या शेवटच्या दिवस चांदीचा दर विनाजीएसटी ७६००० हजार रुपये प्रति किलो इतका होता. मात्र सोमवारी सकाळच्या सत्रात चांदीच्या दर ७५००० हजार रुपयावर आला. चांदीत एक हजार रुपयाची घसरण दिसून आली. तर दुसरीकडे सोन्याच्या दरात १०० रुपयाची घसरण दिसून आली. सध्या जळगावात २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६०,२६० रुपये प्रति तोळ्यावर आहे तर २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६५,८०० रुपये प्रति तोळा इतका आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा दर
सोन्याच्या फ्युचर किमतीत आज नरमाई दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दर २८७ रुपयाने घसरून ६५,२५५ रुपयांवर व्यवहार करत आहे. दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरुवातीला सततच्या तेजीच्या बळावर सोन्याचे वायदे ६६,३५६ रुपये प्रति १० ग्रॅमच्या सर्वोच्च उच्चांकावर पोहोचले होते. दुसरीकडे MCX वर चांदीचा भाव ३५० रुपयांनी घसरला असून ७५३०० रुपयावर ट्रेंड करत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चांदीचा भाव ७८,५४९ रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. अशाप्रकारे, उच्चांकावरून प्रति किलो चांदी तीन हजार रुपये स्वस्त खरेदीसाठी उपलब्ध आहे.