जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । मागील गेल्या दोन -तीन दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण होतानाचे दिसून येत आहे. आज शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात मोठी घट झाली आहे. आज सोनं प्रति १० ग्रम ५३० रुपयाने स्वस्त झालं आहे. त्यापूर्वी काल सोन्याचा भाव स्थिर होता. तर आज चांदीमध्ये देखील मोठी घट झाली आहे. आज चांदी तब्बल ११०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. काल चांदीच्या दरात ३०० रुपयाची वाढ झाली होती.
कोरोना लॉकडाऊन मध्ये काही अंशी सूट मिळताच सोने आणि चांदीच्या भावात मोठी हालचाली दिसून आल्या. मागील काही दिवसापासून दोन्ही धातूंमध्ये चढ-उतार दिसून आला आहे. यामुळे दररोज सोनेआणि चांदीच्या दरात बदल होतानाचे दिसून येत आहे.
कोरोना काळात सहा महिन्यांपूर्वी सोन्याच्या दराने 58 हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यावेळी सर्वच तज्ञांचे अंदाज चुकले होते. आता त्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी 58 हजारांच्या घरात गेलेले सोन्याचे दर आता कमालीचे घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील उलाढालीचा थेट परिणाम होत असल्याने सोन्याचे दर खाली येत असल्याचे तज्ञांचे मत आहे.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,८३८ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,३८० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६०८ रुपये इतका आहे. तर १० ग्रमसाठी तुम्हाला ४६,०८० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
आज चांदीच्या भावात ११०० रुपयांची घट झाली असून आज चांदीचा एक किलोचा भाव ७५,१०० रुपये इतका आहे.