---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य

Gold Price : जळगावच्या सुवर्णपेठेत सोने दराने रचला इतिहास ; आज 10 ग्रॅमसाठी इतकी रक्कम मोजावी लागणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२५ । सोन्याच्या दरात सुरू असलेली तेजी कायम असल्याचं पहायला मिळत असून जळगावच्या सुवर्ण नगरीत सोने दराने इतिहास रचला आहे. सोने दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली असून यामुळे प्रथमच सुद्धा सोने जीएसटीसह ९८ हजारांच्या घरात पोहचले आहे. तर काहींनी याच महिन्यात सोने एक लाख 30 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमची झेप घेईल असा दावा करण्यात येत आहे. Gold Silver Rate Today

gold silver rate jpg webp

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून दररोज नवनवीन उच्चांकी दर गाठत आहे. या दरवाढीमुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा हिरमोड होत आहे. जळगाव सराफ बाजारात बुधवारी १३०० ने तर गुरुवारी ५०० रुपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेट सोने ९५१०० रुपये ( जीएसटीसह ९८०००) प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. महिना अखेरपर्यंत सोने जीएसटीसह एक लाखांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

---Advertisement---

सोमवारी सुरू झालेल्या चालू आठवड्यात मंगळवारी सोने ५०० रुपयांनी घसरले. पण बुधवारी १३०० रुपयाने वाढून ९४६०० रुपये तोळ्यावर पोहोचले होते. गुरुवारीही ही तेजी कायम राहिली. मंगळवारी आणखी ५०० रुपयांनी वाढून सोने ९५६०० रुपये तोळा झाले. अमेरिकेने टेरिफ धोरणानुसार पुन्हा चीनवरील कर १४५ वरून २४५ टक्क्यांवर नेल्याने चीनने डॉलर विक्री सुरू केल्याने सोन्याच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळेच सोन्याचे दर वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment