---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

सोन्याचा भाव पुन्हा 61 हजारांवर, चांदीही महागली ; पहा आजचा नवीनतम दर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२३ । मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्य किमतीत दरदिवसाला चढ-उतार होत असून दोन्ही धातूंच्या किमतींनी आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. यामुळे लग्नसराई व अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सर्वसामन्यांसाठी सोने खरेदी करणे कठीणच झाले आहे. आज सोन्याचा भाव पुन्हा 61 हजारांवर गेला आहे. चांदीही 76 हजारांवर गेली आहे. Gold Silver Rate Today

gold jpg webp webp

आजचा सोन्याचा भाव? Gold Price Today
जळगाव सुवर्ण नगरीत आज सोन्याचा दर 200 रुपयांनी वाढलेला दिसून आला. यामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव पुन्हा 61,000 (विना जीएसटी) रुपयावर गेला आहे. सोमवारी सकाळी सोन्याचा दर 60,800 रुपये इतका होता. येत्या काही दिवसात सोन्याचा दर 63,000 रुपयावर जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

---Advertisement---

आजचा चांदीचा दर | Silver Price Today
आज एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये (विना जीएसटी) इतका आहे. तो काल 75,800 रुपये इतका होता. म्हणजेच चांदीच्या किमतीतही 200 रुपयाची वाढ झालेली दिसून आली. गेल्या आठवड्यातील शुक्रवारी (14 एप्रिल) चांदीच्या किमतीने उच्चांक गाठला आहोत. त्या दिवशी चांदीचे 77,500 रुपयावर मजल मारली होती. मात्र त्यात दुसऱ्या दिवशी शनिवारी चांदीच्या 1600 रुपयाची घसरण झाली आहे. मात्र येत्या काही दिवसात चांदी 80,000 रुपयाचा टप्पा गाठणार असल्याची शक्यता आहे.

हॉलमार्कचे सोनं कसे खरेदी कराल?
सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---