ऐन सणासुदीच्या तोंडावर सोनं-चांदीच्या दराने गाठला ‘हा’ टप्पा : पहा आजचा प्रतितोळ्याचा भाव..
जळगाव लाईव्ह न्यूज : 17 ऑक्टोबर 2023 : सणासुदीचे आगमन होताच सोन्या-चांदीचे भाव वाढू लागले आहेत. गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंच्या किमतीत बंपर वाढ झाली होती. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सुमारे 1500 ते 1700 रुपयांची वाढ झाली होती, तर चांदीच्या दरात 2200 ते 2400 रुपयांची वाढ झाली होती. यामुळे सोन्याचा दर पुन्हा 60 हजारावर गेला आहे. तर चांदीचा दर 72 हजार रुपयावर गेला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने आणि चांदीचे दर घसरत असल्याचे दिसून आले. यादरम्यान सोन्याच्या दर सात महिन्याच्या निचांकीवर पोहोचले होते. दिवाळीपर्यंत दोन्ही धातुंचे दर आणखी कमी होणार असं वाटतं होते. मात्र इस्त्राईल आणि हमास यांच्यामध्ये युद्ध सुरु झाल्याने दोन्ही धातुंचे दर पुन्हा भडकले.
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याने पुन्हा ६० हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. सध्या सोन्याचा दर 60,000 रुपये प्रतितोळा इतका झाला आहे. तर चांदीचा एक किलोचा दर 72000 हजार रुपयावर गेला आहे.
दुसरीकडे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर,आज सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसत आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत सोने 151 रुपयांनी घसरून 59,100 वर ट्रेंड करत आहे. तर चांदीचा भाव 279 रुपयांनी घसरून 70,758 रुपयावर ट्रेंड करत आहे.