खुशखबर! सलग दुसऱ्या आठवड्यात सोने झाले स्वस्त, पहा आताचा भाव..
जळगाव लाईव्ह न्यूज : 17 फेब्रुवारी 2024 : सोने-चांदीच्या किंमतीत चढउताराचे सत्र असून या आठवड्यातही सोन्याच्या किमतीने ग्राहकांना दिलासा दिला आहे. या आठवड्यात सोने 900 रुपयांनी स्वस्त झाले. यामुळे सोन्याचा दर 62 हजाराच्या घरात आला आहे. डिसेंबर महिन्यांच्या उच्चांकानंतर जानेवारीपासून आतापर्यंत सोने दराला मोठी उसळी घेता आलेली नाही. Gold Silver Rate 17 February 2024
सोन्याची किंमत
सलग दुसऱ्या आठवड्यात सोने दरात घसरण दिसून आलीय. या आठवड्यात सोने 900 रुपयांनी घसरले असून त्यात बुधवारी 680 रुपयांच्या घसरणीची भर पडली. 13 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 110 रुपयांनी उतरला. तर 14 फेब्रुवारी रोजी 680 रुपयांची स्वस्ताई आली. 15 फेब्रुवारी रोजी सोने 100 रुपयांनी उतरले. त्यानंतर आता सोने 200 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा दर
या महिन्यात चांदी 1700 रुपयांनी महागली. 12 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली. तर 14 फेब्रुवारी रोजी 1500 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 15 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली. तर 16 फेब्रुवारी रोजी 1100 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,600 रुपये आहे.