⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | लग्नसराई सुरु होण्यापूर्वीच सोन्याच्या दरात वाढ ; पहा प्रति तोळ्याचा भाव..

लग्नसराई सुरु होण्यापूर्वीच सोन्याच्या दरात वाढ ; पहा प्रति तोळ्याचा भाव..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२३ । गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या दिवाळीत सोन्यासह चांदीचा दर अधिक होता. यामुळे खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. सणानंतरही ग्राहकांना सोन्याच्या किमतीतून काही दिलासा मिळताना दिसत नाहीय. सणानंतर लग्नसराई सुरु होण्यापूर्वीच सोन्याच्या दरात वाढ झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोन्याची भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात सोने-चांदीत घसरण दिसून आली. गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने घसरून 57500 रुपये प्रति तोळ्यावर आले होते. तर चांदी 68000 रुपयाच्या घरात आली होती. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळालं. मात्र त्यांनतर इस्त्राईल आणि हमास यांच्यात युद्धानंतर दोन्ही धातूंचे दर चांगलेच भडकले.

ऐन सणासुदीच्या काळात सोने चांदी महागल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला यात काहीसा किंचित दिलासा मिळाला. गेल्या आठवड्यात पण सोन्यात चांगलीच घसरण झाली होती. 14 नोव्हेंबर रोजी सोन्यात 110 रुपयांची दरवाढ झाली. 15 नोव्हेंबर रोजी सोन्याने 400 रुपयांची दरवाढ नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गेल्या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र होते. 11 नोव्हेंबर रोजी एक हजारांची घसरण झाली होती. या आठवड्यात सोमवारी किंमती 600 रुपयांनी घसरल्या होत्या. तर मंगळवारी 15 नोव्हेंबर रोजी चांदीत 600 रुपयांची वाढ झाली. 16 नोव्हेंबर रोजी किंमती 1700 रुपयांनी वाढल्याचा दावा गुडरिटर्न्सने केला आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.