जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । सोने आणि चांदीच्या किमतीत होणारी दरवाढ सुरूच आहे. आज भारतीय वायदा बाजारात, सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) किमती मोठी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याच्या किमतीने पुन्हा 53 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आज सोन्याच्या किमतीत 256 रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी 360 रुपयांनी महागली आहे. Gold Silver Rate Today
लग्नसराईला नुकतीच सुरुवात झाली असून अशात मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमती वाढताना दिसत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास सोन्याच्या किमतीत 256 रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 53,001 रुपायांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. आज 360 रुपयांनी वाढून 61,950 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीचे भाव वधारले
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या किमतीत संमिश्र कल पाहायला मिळत आहे. आज जिथे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे, तिथे चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. सोन्याचा स्पॉट किमती आज 0.26 टक्क्यांनी वाढून $1,774.05 प्रति औंस झाला. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत आज 1.82 टक्क्यांनी घसरून 22.53 डॉलर प्रति औंस झाली.
जळगाव सुवर्णनगरीत सोने चांदी वधारली?
जळगाव सुवर्णनगरीत सोने आणि चांदीच्या किमतीत जोरदार झालेली दिसून येतेय. मागील काही दिवसापूर्वी 51 हजाराखाली असलेला सोन्याचा भाव आता 53 हजारावर गेला आहे. सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 53,200 रुपये इतका आहे. दुसरीकडे चांदी 63,000 रुपये प्रति किलो इतकी आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)