⁠ 
रविवार, मे 5, 2024

आनंदाची बातमी ! सोने पुन्हा स्वस्त, चांदीही मोठ्या किंमतीने घसरली, वाचा नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । सोने -चांदी (Gold Silver Rate) खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची आहे. कारण मागील काही दिवसापासून वाढत असलेल्या सोने आणि चांदीच्या भावाला ब्रेक लागला असून सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ५९० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी १५६० रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने ३७० रुपयाने तर चांदी १०० रुपयाने स्वस्त झाली होती.

आजचा जळगावमधील सोने-चांदीचा भाव?
आज शुक्रवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,५३० रुपये इतका आहे. तर चांदी ७०,४६० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान जागतिक बाजारपेठेत मोठा परिणाम दिसून येत आहे. सुरक्षिततेचा पर्याय म्हणून अनेक गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळविला होता. म्हणून गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी चढ-उतार दिसून आली. रशिया-युक्रेन संकटामुळे (Russia-Ukraine Crisis) सोने १९ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर अर्थात ५५,५०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले होते.यापूर्वी जुलै ते ऑगस्ट २०२२ मध्ये सोने ५६,२०० रुपये प्रति तोळ्यापर्यंत वधारले होते.

मात्र आता रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यांच्यात चर्चा सुरु झाली आहे. यामुळे देशांतर्गत सोने-चांदीच्या (Gold Silver Rate) किंमती घसरू लागल्या आहे.दोन दिवसात सोने ९६० रुपायांने स्वस्त झालं आहे. तर चांदी १६६० रुपयाने स्वस्त झाली आहे. गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोने १५०० रुपयांनी महागले आहे. तर चांदी २६०० रुपायांनी महागली.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५३,७९० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५४,७७०, बुधवारी ५५,५००, गुरुवारी ५३,९८०, शुक्रवार ५४,४९० इतका आहे. तर दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ७०,७८० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ७१,६१०, बुधवारी ७३,०६०, गुरुवारी ७१,२१०, शुक्रवार ७२,१२० प्रति किलो इतका होता.