जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । कोरोना नियंत्रण आणि सावरणार अर्थव्यवस्था यामुळे गुंतवणूकदारांनी कमॉडिटीमधून पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यामुळे सोने आणि चांदीममध्ये घट होतानाचे दिसून येत आहे. दरम्यान, आज मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. आज सोने प्रति १० ग्रम २६० रुपयाने स्वस्त झाले आहे, तर चांदीच्या भावात ८०० रुपयाची घट झाली आहे. काल सोमवारी सोने आणि चांदीचा दर स्थिर होता.
कोरोना लॉकडाऊन मध्ये काही अंशी सूट मिळताच सोने आणि चांदीच्या भावात मोठी हालचाली दिसून आल्या. मागील काही दिवसापासून दोन्ही धातूंमध्ये चढ-उतार दिसून आला आहे. त्यामुळे सोने पुन्हा ५० हजाराच्या दिशेने जातानाचे दिसून आले आहे. तर चांदी ७६ हजाराच्या पुढे गेले आहे.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९०७ रुपये इतका आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,०७० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,६७३ रुपये इतका आहे. तर १० ग्रमसाठी तुम्हाला ४६,७३० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
तर आज चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. आज चांदी तब्बल ८०० रुपयांनी स्वस्त होऊन आज एक किलो चांदीचा भाव ७६,५०० रुपये आहे.
आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग
आजपासून सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग असणे बंधनकारक करण्यात आले आहे. खरंतर या नियमाची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार होती. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे ही मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली. त्यानुसार आजपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होईल.
या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील. यामुळे ग्राहकांची फसवणूक न होता त्यांना शुद्ध सोने मिळेल.