जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२३ । भारतात सणासुदीचे दिवस अवघ्या काही दिवसावर आहे या काळात सोने आणि चांदीच्या किमतीला मोठी मागणी असते. दरम्यानं सध्या दोन्ही धातूंमध्ये मोठी पडझड सुरु असून आज गुरुवारीही सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झालेली दिसून येतेये. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये सोने आणि चांदी या दोन्हीच्या किमती घसरल्या आहेत.
आज सोन्याचा भाव ५९ हजारच्या खाली घसरला आहे. याशिवाय चांदीचा भावही ७१ हजार रुपयाच्या आसपास आहे. अमेरिकेतील महागाई दर वाढण्याच्या अपेक्षेमुळे सोन्याच्या किमती दबावाखाली आहेत. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे ते पाहूया-
एमसीएक्सवर सोन्या-चांदीचे भाव घसरले
MCX वर सोन्याची किंमत -0.05 टक्क्यांनी घसरून 58,561 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर आहे. त्याच वेळी, चांदीचा भाव 0.43 टक्क्यांनी घसरून 71,113 रुपये प्रति किलो झाला आहे.
दरम्यान, दुसरीकडे गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्यात सोन्याला झेप घेता आलेली नाही. या महिन्यात पडझडीचे सत्र दिसून आले. या 14 दिवसांत दहा दिवस तर घसरण दिसून आली. सध्या 22 कॅरेट सोने 54650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे.तर सध्या एक किलो चांदीचा भाव 72000 रुपये पर्यंत आहे.