सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा ; तपासून घ्या आजचा भाव..
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२४ । गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आली. यामुळे सोन्याच्या किमतीने रेकॉर्ड ब्रेक केले. ऐन लग्नसराईत सोन्याच्या किमतीने मोठा पल्ला गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. गेल्या दहा दिवसांत सोने 3,430 रुपयांनी तर चांदीत 2300 रुपयांनी उसळली घेतली. पण या आठवड्यात दरवाढीला ब्रेक लागला. या तीन दिवसांत भावात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.
या आठवड्यात दरवाढीच्या आघाडीवर शांतता दिसून आली. 10-11 मार्च रोजी किंमती स्थिर होत्या. 12 मार्च रोजी किंमती किरकोळ 10 रुपयांनी कमी झाल्या. 13 मार्च रोजी यामध्ये 420 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मार्च महिन्यातील सुरुवतीच्या दहा दिवसांत चांदीने 3 हजारांची चढाई केली. तर या आठवड्यात सोमवारी पहिल्या दिवशी चांदी 100 रुपयांनी उतरली. तर 12 मार्च रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली. 13 मार्च रोजी 900 रुपयांची मोठी घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 75,200 रुपये आहे.