जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२३ । सध्या सोने आणि चांदीचा भाव स्थिरावला आहे. गेल्या मे महिन्यात उच्चांक गाठल्यानंतर जून महिन्यात मात्र सोने-चांदीने नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. सध्या घसरण झाली असली तरी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी 60,000 रुपयावर आहे.
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर धोरणावरती आता सोने-चांदीच्या किंमतीत मोठी तफावत दिसू शकते. पण सध्या सोने-चांदीतील पडझड कायम आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याच्या किमतीत 145 रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा दर 59,361 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर 326 रुपयांनी वाढला असून यामुळे एक किलो चांदीचा दर 72,420 रुपयांवर व्यवहार करत आहे.
जळगावात काय आहे सोने चांदीचा दर?
जळगाव सराफा बाजारात सध्या सकाळच्या सत्रात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव विनाजीएसटी 55,000 रुपयावर आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर विनाजीएसटी 60,000 रुपये इतका आहे. चांदीचा दर 74,500 रुपये विनाजीएसटी इतका होता.