⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | वाणिज्य | आज स्वस्तात खरेदीचा चान्स ; सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण, लगेचच तपासा भाव

आज स्वस्तात खरेदीचा चान्स ; सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण, लगेचच तपासा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । मागील काही सत्रात सोन्याच्या (Gold Rate) भावात वाढ होतानाचे दिसून आले. मात्र आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या (Silver Rate) भावात देखील मोठी घसरण झाली. आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात १०६० रुपयाची घसरण झाली. यामुळे सोने पुन्हा ५१ हजाराच्या घरात आले आहे. तर आज चांदी प्रति किलो १६६० रुपयांनी घसरणी आहे. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्यासाठी ही मोठी संधी आहे. यापूर्वी काल सोमवारी सोने ७१० रुपयाने महागले होते. तर चांदी ५३० रुपयांनी महागली होती.

आजचा सोने -चांदीचा दर? Gold Silver Rate Today
आज मंगळवारी सोन्याचा भाव ५१,८५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे चांदी ६१,७२० रुपये प्रति किलोवर आली आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ट पातळीवरून वर खाली होत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपयांवर गेला होता. तर चांदीचा प्रति किलोचा दर ७४ हजारांवर गेला होता. दरम्यान, उच्चांक दरापासून सोनं जवळपास ४५०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदी तब्बल १३ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

गेल्या आठवड्यात सोने तीन वेळा स्वस्त दोन वेळा महागले आहे. तर चांदी चार वेळा स्वस्त तर एक वेळा महागली आहे. चार दिवसात सोने जवळपास १०० रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे चांदी ९०० रुपयांनी घसरली आहे.

दरम्यान सध्या महागाई वाढत असल्यामुळे महागाई नियंत्रणासाठी गेल्या आठवड्यात आरबीआयच्या वतीने रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेपो रेट वाढल्याचा परिणाम हा सोन्याच्या भावावर दिसत असून, सध्या सोन्याचे दर स्थिर आहेत. मात्र पुढील काळात सोन्याच्या दरात काहीशी तेजी पहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
६ जून २०२२- रुपये ५२,१६० प्रति १० ग्रॅम
७ जून २०२२ – रुपये ५२,०६० प्रति १० ग्रॅम
८ जून २०२२ – रु ५२,१६० प्रति १० ग्रॅम
९ जून २०२२ – रु ५२,२५० प्रति १० ग्रॅम
१० जून २०२२ – रु ५२,२०० प्रति १० ग्रॅम

गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
६ जून २०२२- रुपये ६३,११० प्रति किलो
७ जून २०२२ – रुपये ६३,७६० प्रति किलो
८ जून मे २०२२- रुपये ६३,७०० प्रति किलो
९ जून मे २०२२- रुपये ६३,४८० प्रति किलो
१० जून मे २०२२- रुपये ६२,८५० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.