⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | वाणिज्य | विक्रमी पातळीवरून सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, सणासुदीत भाव पुन्हा वाढणार..

विक्रमी पातळीवरून सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, सणासुदीत भाव पुन्हा वाढणार..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२३ । जागतिक घडामोडीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर देखील होत असतो. अमेरिकेत महागाईने डोकेवर काढल्याने सोने-चांदी (Gold Silver Rate) दबावाखाली आले आहे. भारतात येत्या काही दिवसानंतर सणासुदीचे दिवस सुरु होणार आहे. याकाळात सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढू शकतात, असे विश्लेषकांचे मत आहे. मात्र सध्या सप्टेंबर महिना खरेदीदारांना पावला आहे. Gold Silver Rate Today

या महिन्यात दरवाढीपेक्षा पडझडीचेच सत्र सुरु आहे. आता अर्धा सप्टेंबर होत आला आहे. पण याकालावधीत सोन्याला मोठी कामगिरी बजावता आली नाही. दोन्ही धातूच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. विक्रमी पातळीवरून सोने चांदीत मोठी घसरण झालेली दिसून येतेय.

विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोन्याचा भाव चार महिन्यांत २,६३९ रुपये प्रति १० ग्रॅमने घसरला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए)च्या आकडेवारीनुसार, यावर्षी ४ मे रोजी सोने ६१,६४६ रुपयांच्या विक्रमी पातळीवर होते, जे मंगळवारी ५९,००७ रुपयांपर्यंत घसरले.

दरम्यान, चांदीचा भाव किलोमागे ६,१५२ रुपयांनी घसरला. आयबीजेएनुसार, ५ मे रोजी चांदी ७७,२८० रुपये प्रति किलो या विक्रमी पातळीवर होती. आता तो ७१,१२८ रुपये प्रति किलोवर आला. आयबीजेए देशातील १४ प्रमुख शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या सरासरी किमती देते. सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू शकतात, असे विश्लेषकांचे मत आहे.

जळगावातील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर ७२,००० रुपये प्रति किलो इतका आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.