जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२३ । गेल्या मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरू आहे. गेल्या महिन्यातील सुरुवातीला सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले होते. मात्र आता सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या किमतीत नरमाई आली आहे.
जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात घसरण होत आहे. सध्या सोन्याचा भाव 60,000 च्या पातळीवर आहे.
सोने-चांदीचा भाव काय
आज 13 जून 2023 रोजी सकाळच्या सत्रात सोने-चांदीचे दर जाहीर झालेले नाहीत. 12 जून रोजी 22 कॅरेट सोन्यात 100 रुपयांची घसरण होऊन भाव 55,550 रुपयांवर पोहचले. तर 24 कॅरेट सोने 100 रुपयांनी घसरल्याने हा भाव 60,600 रुपयांपर्यंत घसरले. गुडरिटर्न्सने हे भाव जाहीर केलेले आहेत. शुक्रवारी सोन्यात 400 रुपयांची वाढ झाली तर चांदीने 1100 रुपयांची चढाई केली होती.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
सोमवारी 24 कॅरेट सोने 59921 रुपये, 23 कॅरेट 59682 रुपये, 22 कॅरेट सोने 54887 रुपये, 18 कॅरेट 44940 रुपये आणि 14 कॅरेट सोने 35053 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.
जळगावात काय आहे सोने चांदीचा दर?
जळगाव सराफा बाजारात सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव विनाजीएसटी 55,000 रुपयावर आहे. यापूर्वी काळ 55,400 रुपये इतका होता. जर आपण 24 कॅरेट 10 ग्रॅम शुद्ध सोन्याबद्दल बोललो, सध्या त्याची किंमत विनाजीएसटी 60,000 रुपये 10 ग्रॅम इतका आहे. हाच दर काल सकाळी 60,400 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणेजच सोन्याच्या किमतीत 400 रुपयापर्यंतची घसरण झालेली दिसून येतेय. चांदीचा एक किलोचा दर सध्या विनाजीएसटी 74000 रुपये इतका आहे. हाच दर काल सकाळी 74,500 रुपये इतका होता.
अॅपद्वारे शुद्धता तपासा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.