जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ठ पातळीवरून वर-खाली होत असल्याचे दिसून आले. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात किंचित घसरण झाली आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या भावात वाढ दिसून आलीय. आज सोमवारी, एमसीएक्सवर सोने लाल चिन्हाने उघडले. उघडल्यानंतर, 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 90 रुपयांनी घसरली आहे. तर चांदी 215 रुपयांनी महागली आहे. दरम्यान, जळगावमध्ये गेल्या दोन दिवसात चांदी तब्बल 1100 रुपयांनी महागली असल्याचे दिसून येतेय.
MCX वरील आजचा सोने आणि चांदीचा भाव?
MCX वर, सकाळी 10 वाजेनंतर 24-कॅरेट शुद्धतेचे सोने 50,440 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. तर दुसरीकडे आज सकाळी चांदीचा प्रति किलोचा दर तब्बल 215 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव 55,265 रुपयावर गेला आहे.गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गेल्या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (22 ते 26 ऑगस्ट) 24 कॅरेट सोन्याचा दर 50,770 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 50,877 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीचा भाव 53,363 रुपयांवरून 54,700 रुपये प्रति किलो झाला आहे. आता या आठवड्याची सुरुवात सोन्याच्या घसरणीने झाली आहे.
जळगावमधील दर
जळगाव सराफ बाजारात मागील काही सत्रात सोन्याच्या भावात काहीशी वाढ दिसून आलीय. दुसरीकडे चांदीही वाधरली आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 51,350 रुपये इतका होता. तो आज सोमवारी 51,400 रुपयावर आला आहे. तर शुक्रवारी एक किलोचा भाव 55,500 रुपये इतका होती. तो आज 56,500 रुपयांवर आला आहे. गेल्या दोन दिवसात चांदी तब्बल 1100 रुपयांनी महागली आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
दरम्यान, देशात सणासुदीला सुरुवात झाली असून अशा परिस्थितीत सोन्याची मागणी वाढते. मात्र, दिवाळीपर्यंत सोन्यात आणखी घसरण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या जागतिक परिस्थिती पाहता अल्पावधीत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता कमी दिसत आहे.
अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे.