जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२४ । सोन्याची खरेदी (Gold) करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागील मे महिन्यात सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक विनाजीएसटी ७५ हजार रुपयाचा टप्पा ओलांडला होता. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसली होती. मात्र जून महिन्यात सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं दिसत आहे. जळगावात आता सोन्याचा भाव प्रति तोळा ७२ हजाराच्या खाली आला आहे.
जळगावात सोन्याचे भाव मे महिन्याच्या विक्रमी उच्चांकावरून जवळपास ४००० हजार रुपयांनी घसरले आहे. देशांतर्गत बाजाराबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या देशांतर्गत बाजारात प्रति १० ग्रॅमचा सोन्याचा भाव हा ७१ हजार रुपयांच्या खाली गेला आहे. दरम्यान गेल्या मे महिन्यात सोन्याचा दर विक्रमी ७५ हजार रुपयांवर गेला होता. जीएसटीसह हा दर ७७ हजार रुपयावर गेला होता.इराण-इस्त्राईल युद्धजन्य परिस्थितीनंतर सोन्यात तेजी आली. मात्र, वातावरण थंडावल्यानंतर दरात स्थिरता आली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्यात घसरण दिसून आली.
मात्र आगामी जुलै महिन्यात सोन्याचे दर पुन्हा वाढण्यास सुरुवात होऊन डिसेंबरपर्यंत हे दर ८० हजार रुपये तोळ्यापर्यंत जाऊ शकतील असा अंदाज सोन्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे जाणकारांनी व्यक्त केला आहे.
काय आहेत आता सोने-चांदीचा भाव?
सध्या जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ७१ हजार ८०० रुपयावर आला आहे. सोबतच चांदीचा विनाजीएसटी ९० हजार रुपये प्रतिकिलोवर आली आहे. दरम्यान मे महिन्याच्या अखेरीस चांदीचा दर विनाजीएसटी ९४ हजार रुपयावर गेला होता. आता उच्चांकीपासून चांदीचा दरही जवळपास ४००० हजार रुपयांहून अधिकने घसरला आहे. सध्या चांदीच्या भावातील सततच्या या चढ-उतारांनी सराफा व्यावसायिकही संभ्रमात पडले आहेत.