जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । लग्नसराईच्या काळात सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सोन्याचे भाव स्थिर असल्याचे दिसत आहेत. तर दुसरीकडे आज आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झालेली दिसून येत आहे. सोने-चांदी खरेदीसाठी हा काळ चांगला असल्याचे सराफा बाजाराशी संबंधित तज्ज्ञांचे मत आहे.
जळगाव सराफा बाजारात सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव विनाजीएसटी 55,400 रुपये आहे. जर आपण 24 कॅरेट 10 ग्रॅम शुद्ध सोन्याबद्दल बोललो, सध्या त्याची किंमत विनाजीएसटी 60,400 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. 11 जूनलाही हाच दर होता. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 62 हजारावर गेला होता. त्यात आतापर्यंत जवळपास 1500 रुपयाहुन अधिकची घसरण झालेली दिसून येतेय.
जळगावात मात्र गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून येतंय. गेल्या सोमवारी चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 72,500 रुपयापर्यंत होता. तो आता सध्या 74,500 रुपये प्रति किलो इतक्यावर आला आहे. म्हणजेच त्यात तब्बल दोन हजार रुपयांनी चांदी महागली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोमवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा दर 118 रुपयांनी घसरला असून 59,703 रुपयावर व्यवहार करत आहे. सोबतच चांदीचा दर 442 रुपयांनी घसरला असून 73,354 रुपयावर व्यवहार करत आहे.