⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | ग्राहकांना पुन्हा झटका ! सोने-चांदीचा दर इतक्या रुपयांनी वाढला, पहा नवे दर

ग्राहकांना पुन्हा झटका ! सोने-चांदीचा दर इतक्या रुपयांनी वाढला, पहा नवे दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२३ । सलग दुसऱ्या आठवड्यातही सोने आणि चांदीच्या भावात घसरण दिसून आली. मात्र आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी दोन्ही धातूंमध्ये दरवाढ झाली. धनत्रयोदशीला सोने आणि चांदीने (Gold Silver Price Today) दरवाढीचा मुहूर्त गाठला. त्याचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसला. त्यांना दागदागिने खरेदीसाठी जादा दाम मोजावे लागले. इतके वाढले सोने-चांदीचे भाव?

धनत्रयोदशी दिवशी सोने चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. त्यामुळे ग्राहकांनी बाजारपेठेत तोबा गर्दी केली होती. मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. पण सोने-चांदीत शुक्रवारी दरवाढ झाली.

सोन्याचा दर
सोन्याच्या दरात ऑक्टोबर महिन्यात चार हजारांची विक्रमी दरवाढ झाल्यानंतर ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यात आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला घसरण झाली. 31 ऑक्टोबरपासून कालपर्यंत सोन्यात 1650 रुपयांची स्वस्ताई आली. या आठवड्यातील चार दिवसांमध्ये, सोन्यात 880 रुपयांची घसरण झाली होती. 10 नोव्हेंबर रोजी सोन्यात 300 रुपयांची दरवाढ झाली. आता 22 कॅरेट सोने 56,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा दर
या आठवड्याच्या सुरुवातीलाच 6 नोव्हेंबर रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. नंतर चांदीने आनंदवार्ता दिली. 7 नोव्हेंबर रोजी किंमती 700 रुपयांनी घसरल्या. 8 नोव्हेंबर रोजी 1000 रुपयांची स्वस्ताई आली. तर 9 नोव्हेंबर रोजी किंमती 300 रुपयांनी उतरल्या. 10 नोव्हेंबर रोजी चांदीत 800 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,000 रुपये आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.