---Advertisement---
वाणिज्य

सोने-चांदीच्या किमतीने ओलांडला ‘हा’ महत्वाचा टप्पा, जाणून घ्या आजचे भाव?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२२ । आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold Silver) किमतीत होत असलेल्या वाढीचा परिणाम भारतीय सराफा बाजारात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमती वाढ नोंदविली जात आहे. यामुळे सोन्याचा भाव पुन्हा एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. सततच्या दरवाढीने सोन्याच्या भाव 52 हजारावर गेला आहे. सोबतच चांदीच्या भाव देखील 62 हजारांवर गेला आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही धातू पुन्हा महागले आहे. Gold Silver Rate Today

gold silver jpg webp

जाणून घ्या आज सोने-चांदीचा भाव किती आहे?
दिवाळी सण होताच लग्नसराईला सुरुवात झाली आहे. या काळात सोने आणि चांदीला मोठी मागणी असते. मात्र ऐन दिवाळी सणापासून सोन्यासह चांदीचे दर वाढताना दिसून येत आहे. आज शुक्रवारी सकाळी 10 वाजेलामल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 34 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे प्रति तोळा सोन्याची किंमत 52,143 रुपयावर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे आज चांदी 110 रुपयाची वधारली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव 62,019 रुपयावर गेला आहे.

---Advertisement---

जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव 50,800 इतका होता. तर चांदीचा भाव 59,000 रुपयापर्यंत होता. मात्र सध्या आता सोन्याचा भाव 52000 रुपायांवर गेला आहे. त्याचसोबत चांदीच्या किमतीने देखील 62 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. म्हणजेच गेल्या आठ दिवसात सोने जवळपास 1000 ते 1200 रुपयांनी महागले आहे. तर चांदी 2000 रुपयापर्यंत वधारली आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---