⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

सोन्याने मारली मोठी मुसंडी ; आता 10 ग्रॅमसाठी मोजावे लागताय इतके पैसे?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२४ । गेल्या आठवड्यात सोन्याने नवा उच्चांक दर गाठला आहे. या दरम्यान दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ झाली. त्यामुळे आगामी आठवडा मौल्यवान धातूंसाठी कसा जाईल याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी दोन्ही धातूंच्या किमतींमध्ये किंचित घट नोंदवण्यात आली. Gold Silver Rate 11 March 2024

आज सोमवारी सकाळी सराफा बाजार घसरणीसह उघडला. या काळात सोने 10 रुपयांनी आणि चांदी 100 रुपयांच्या घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहे. सध्या भारतीय सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी 60,729 रुपये आणि विनाजीएसटी 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,250 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर चांदीची किंमत विनाजीएसटी 74,290 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आली आहे.

जळगावातील सोने आणि चांदीचा भाव:
जळगावातील सराफ बाजारात गेल्या आठवड्यात सोने दरात 2500 रुपयांची वाढ दिसून आली. तेजी कायम राहिली तर सोने 70 हजार रुपये तोळा या नव्या उच्चांकीचा टप्पा गाठू शकेल असा जाणकारांचा अंदाज आहे. दरम्यान, सध्या 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 66,000 रुपयांवर असून दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर 74000 रुपयावर आहे.