⁠ 
बुधवार, जुलै 24, 2024

सोन्याचा तोरा 66 हजारांवर, चांदीही झाली महाग ; पहा आज काय आहे भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 10 मार्च 2024 । या आठवड्यात सोन्याच्या किमतीने उंच भरारी घेतली. डिसेंबरनंतर मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. दुसरीकडे चांदीत देखील मोठी वाढ दिसून आली. या आठवड्यात सोने प्रति तोळ्यामागे २३०० रुपयांनी महागले तर चांदी दरात २००० रुपयांहून अधिकची वाढ दिसून आली. सततच्या दरवाढीने जळगाव सराफ बाजारात सोन्याचा दर विनाजीएसटी तब्बल ६६ हजार रुपयावर गेला. Gold Silver Rate 10 March 2024

एकीकडे लग्नसराईचे दिवस सुरु आहे. यातच सोने आणि चांदीत मोठी वाढ झाल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसला. सोन्याच्या दरवाढीमागे अमेरिकेच्या फेडरलसह दोन बँकेतील अस्थिरतेचे कारण सांगितले जात आहे. तर चीन व जपान या दोन देशांनी औद्योगिक खरेदी वाढवल्याने चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

जळगावात ३ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा दर विनाजीएसटी ६३,७५० रुपयांवर होता. सध्या सोन्याचा दर ६६००० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचले आहे.या आठवड्यात सोने प्रति तोळ्यामागे २३०० रुपयांनी महागले. दुसरीकडे चांदीचा दर गेल्या रविवारी विनाजीएसटी ७२००० रुपये प्रतिकिलो होते. सध्या चांदीचा दर ७४ हजारांवर पोहोचले, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.