---Advertisement---
सोने - चांदीचा भाव वाणिज्य

Gold Silver Today : सोन्याच्या किमतीत घसरण, चांदीही झाली स्वस्त ; त्वरित तपासा आजचे दर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२२ । जागतिक बाजारातील नरमाईमुळे आज भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold Silver Rate) दरात घसरण झाली. आज सोन्याच्या भावात 200 रुपयापर्यंतची घसरण झाली आहे.तर पण सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 52 हजारावर आहेत. तर दुसरीकडे चांदी 320 रुपयांनी घसरली आहे. Gold Silver Rate Today

gold silver price jalgaon

आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 52,273 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. यापूर्वी सोन्याचा व्यवहार 52,450 रुपयांच्या पातळीवर उघडपणे सुरू झाला होता, परंतु मागणी कमी झाल्यामुळे लवकरच भावात घसरण दिसून येऊ लागली. मंगळवारी सोन्याचा भाव 52,470 रुपये इतका होता. आज त्यात घसरण झाली आहे,

---Advertisement---

दुसरीकडे एमसीएक्सवर चांदीचा भाव 320 रुपयांनी घसरून 58,470 रुपये प्रति किलो झाला. यापूर्वी चांदीचा व्यवहार 58,791 रुपयांच्या पातळीवर उघडपणे सुरू झाला होता, परंतु लवकरच जागतिक बाजाराचा दबाव त्यावरही दिसू लागला.

जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट किंमत $1,790.60 प्रति औंस आहे, जी त्याच्या मागील बंद किंमतीपेक्षा 0.18 टक्के कमी आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट किंमत आज 20.44 डॉलर प्रति औंसवर आहे. चांदीही मागील बंद किमतीपेक्षा 0.34 टक्क्यांनी खाली आहे. गेल्या काही सत्रांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात उसळी आली होती, मात्र आता पुन्हा दबाव दिसून येऊ लागला आहे.

सोन्या-चांदीचे भविष्य कसे असेल
जागतिक बाजारपेठेतील सोन्याच्या किमतीवर अमेरिकन बाजाराचा लक्षणीय परिणाम होत असून अमेरिकेतील गुंतवणूकदार आज महागाईच्या आकडेवारीची वाट पाहत आहेत. यूएस चलनवाढीची आकडेवारी फेड रिझर्व्हचे पुढील धोरण ठरवेल आणि सोन्याची हालचालही त्यावर अवलंबून असेल. महागाईचे आकडे समोर येण्यापूर्वी गुंतवणूकदार थोडी सावधगिरी बाळगत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या तरी महागाईपासून फारसा दिलासा मिळत नसल्याने सोन्या-चांदीच्या किमतींवरील दबाव कायम राहील, असा अंदाज आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---