जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । दोन दिवसाच्या भाव वाढीनंतर आज सोन्याचा दर जैसे थे आहे. मात्र चांदीच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जळगावमधील सुवर्णबाजारात आज चांदी ७०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
देशांतर्गत बाजारात सलग दुसर्या दिवशी सोनेच्या किमती वाढल्यात. जळगावच्या सुवर्णबाजारात गेल्या दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत चढउतार दिसून आले. काल बुधवारी जळगावमधील सुवर्णबाजारात सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम २१० रुपयांची वाढ झाली. तर चांदी ६०० रुपयाने वाढली आहे. सततच्या चढ उताराने सोने एकदा पुन्हा ५० हजाराच्या उंबरठ्यावर आले आहे.
आजचा सोन्याचा भाव
२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव ४,९७० रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४९,७०० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,७३३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४७,३३० रुपये मोजावे लागतील.
चांदीचा भाव
आज चांदी ७०० कमी झाली आहे. त्यामुळे चांदीचा आजचा १ किलोचा भाव ७१,९०० रुपये आहे. मागील तीन चार दिवसात चांदी ६ हजाराहून अधिक स्वस्त झाली आहे.