⁠ 
गुरूवार, जानेवारी 9, 2025
Home | जळगाव जिल्हा | Gold Rate : आज सोनं पुन्हा महागले; आता 10 ग्रॅम खरेदीसाठी मोजावे लागणार इतके रुपये?

Gold Rate : आज सोनं पुन्हा महागले; आता 10 ग्रॅम खरेदीसाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२५ । एकीकडे लग्नसराई सुरु असून मात्र याच दरम्यान मौल्यवान वस्तू सोन्याचे दर वाढताना दिसत आहे. आज बुधवारी सुद्धा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सोने खरेदीसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. Gold Rate Today

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली असून 78,820 रुपये प्रतितोळा सोनं पोहोचलं आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 72,250 रुपयांवर पोहोचलं आहे. तर, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 90 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा सोनं 59,120 रुपयांवर पोहोचलं आहे.

या वर्षात सोन्या-चांदीच्या दरात अधिक वाढ होऊ शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जगभरातील घडणाऱ्या घटनांचाही त्यावर परिणाम होत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री सुरू राहिल्याने विदेशी बाजारातील मजबूत कल आणि देशांतर्गत मागणी वाढल्याने सराफा किमतीत वाढ झाली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.