हुश्श! उच्चांकानंतर सोने-चांदी दरात मोठी घसरण, जळगावात आताचे दर काय?

जानेवारी 22, 2026 4:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक बाजारात गेल्या काही दिवसांपासून विक्रमी पातळीवर असलेल्या सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आज गुरुवारी सकाळच्या सत्रात लक्षणीय घसरण पाहायला मिळाली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

gold

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आज गुरुवारी सकाळी सोने दरात २८८४ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५६ हजार ७६६ रूपयांपर्यंत खाली आले. यापूर्वी काल बुधवारी दिवसभरात सोने दरात ६७९८ रूपयांची वाढ नोंदवली गेल्यामुळे सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५९ हजार ६५० रूपयांचा उच्चांक केला होता. मात्र आज घसरण दिसून आली.

Advertisements

सोन्यापाठोपाठ आज सकाळी चांदी दरातही घसरण झाली. चांदीत १० हजार ३०० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह तीन लाख २४ हजार ४५० रूपयांपर्यंत घसरली. यापूर्वी काल दिवसभरात ५१५० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो तीन लाख ३४ हजार ७५० रूपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचली होती.

Advertisements

दरम्यान सोन्यासह चांदीचे दर घसरले असले तरी दोन्ही धातूंचे दर सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेरच आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावरून सुमारे एक टक्क्यांनी खाली आल्या, तर चांदीच्या किमतींमध्येही नरमाई दिसून आली. या घसरणीचे मुख्य कारण ग्रीनलँडबाबत सुरू असलेल्या भू-राजकीय तणावात झालेली घट असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now