अबब! चांदीने 2 लाखाचा टप्पा ओलांडला, सोन्याच्या किमतीतही वाढ… नवीनतम दर तपासा

डिसेंबर 18, 2025 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावात चढउतार होताना पाहायला मिळत असून जळगावच्या सराफ बाजारात बुधवारी एकाच दिवसात तब्बल ७ हजाराहून अधिकची वाढ झाल्यानं चांदीने तब्बल २ लाख रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे चांदीने आजपर्यंत ऐतिहासिक उच्चांक गाठला असून यामुळे ग्राहकांसह सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

gold silver

जळगाव सराफ बाजारात बुधवारी दिवसभरात चांदी ७२१० रुपयांनी वाढून २,०७,५४५ रुपये किलोवर स्थिरावली. हा चांदीचा नवा सर्वकालीन उच्चांक ठरला तर सोनेही ६१८ रुपयांनी वाढून १,३६,५७८ रुपये तोळ्यावर पोहोचले आहे.

Advertisements

अवघ्या १६ दिवसात चांदी २९,६३० रुपयांनी महागली आहे. १ डिसेंबरला चांदी १,७९,२२० रुपये होती. बुधवारी ती विक्रमी २,०७,५४५ रु. दरावर पोहचली.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now