जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२५ । मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दररोज नवनवीन उच्चांक गाठताना दिसत असून ऐन दिवाळी तोंडावर होत असलेल्या दरवाढीने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. अशातच सोने दरवाढीला आज ब्रेक लागला आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये मोठी घट झाली आहे. दुसरीकडे मात्र चांदी दरात मोठी वाढ झालीय. Gold Silver Rate Today

काय आहे सोन्याचा नवीन दर ?
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,८६० रुपयांनी कमी झाले आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,२२,२९० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,७०० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१२,१०० रुपये मोजावे लागणार आहे. त्याचबरोबर आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच घसरण झाली आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात १,३९० रुपयांनी घट झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९१,७२० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

दुसरीकडे मात्र आज चांदी दरात मोठी वाढ दिसून आलीय. आज १० ऑक्टोबर रोजी एक किलो चांदीच्या दरामध्ये ३००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज या चांदीची किंमत १,७०,००० रुपये इतकी झाली आहे.

दरम्यान आज सोने दरात घसरण झाली असली तरी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि स्थानिक मागणीचा परिणाम म्हणून सोने चांदी दरात वाढ झाली असावी असा अंदाज आहे



