जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२४ । सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून सोने आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. यातच या आठवड्यात मौल्यवान घातूंमध्ये बरीच घसरण दिसून आली. विशेष सोन्यापेक्षा चांदी दरात मोठी घसरण झालीय. मात्र आठवड्याच्या अखेरीस सोन्यासह चांदी दरात पुन्हा वाढ झाली.
जळगावच्या सराफ बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असलेल्या चांदीच्या भावात शनिवारी (२१ डिसेंबर) एक हजार ८०० रुपयांची वाढ झाली. यामुळे चांदी ८८ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहचली. तसेच सोने भावातही ६०० रुपयांची वाढ होऊन ते ७६ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले.
चांदीत गुरुवारी (१९ डिसेंबर) चार हजार रुपयांची घसरण झाली होती. शुक्रवारी चांदीचा भाव ८६ हजार २०० रुपये प्रती किलो होता. मात्र शनिवारी (२१ डिसेंबर) ती ८८ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. सोने ७६ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे.ही दर वाढ जास्त नसली तरी आत्ताचे दर पाहता, सोनं खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.