---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

सोने भावाने पन्नाशी ओलांडली, आज पुन्हा महागले सोने-चांदी

gold
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । जळगाव (Jalgaon) सुवर्णनगरीत सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या (Gold Price) भावात वाढ झालीय. यामुळे सोन्याच्या दराने पुन्हा पन्नाशी ओलांडली आहे. सोबतच चांदीच्या (Silver Price) दरात देखील मोठी वाढ झाली आहे. जळगाव सराफ बाजारात आज शुक्रवारी १० ग्रॅम सोन्याच्या दरात ३०० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीच्या प्रति किलोच्या दरात ५९० रुपयाची वाढ झाली आहे. यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने २४० तर चांदीच्या दरात ३३० रुपयाची वाढ नोंदविली गेली होती.

gold

आजचा सोने-चांदीचा भाव?

---Advertisement---

शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०,१०० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६४,७५० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ दिसून येते.

अमेरिकेन महागाईची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे. मागणीत वाढ झाल्याने भारतीय सराफ बाजारात सोने तेजीत आहेत. जळगाव सराफ बाजारात ५ दिवसात सोने १०६० रुपयांनी महागले आहे. तर चांदी तब्बल २५९० रुपयांनी महागली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात २०० रुपया पर्यंतची घट दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात १२०० रुपयाची घट झाली आहे. मात्र चालू आठवड्यात सोन आणि चांदी दरात तेजी दिसून आली.
दरम्यान, येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत.

जागतिक पातळीवरील सोन्याचा भाव?
जागतिक कमॉडिटी बाजारात आज सोन्याचा भाव १८२५.८९ डॉलर प्रती औंस इतका आहे. मागील दोन आठवड्यातील हा सर्वाधिक दर आहे. चांदीचा भाव २३.१८ डॉलर प्रती औंस झाला. त्यात ०.४ टक्के वाढ झाली.

या आठवड्यातील दर

सोने दर :
७ फेब्रुवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा
८ फेब्रुवारी (मंगळवार) ४९,३६० रुपये प्रति तोळा
९ फेब्रुवारी (बुधवारी) ४९,५६० रुपये प्रति तोळा
१० फेब्रुवारी (गुरुवार) ४९,८०० रुपये प्रति तोळा
११ फेब्रुवारी (शुक्रवा) ५०,१०० रुपये प्रति तोळा

चांदी दर:
७ फेब्रुवारी (सोमवार) चांदीचा दर ६२,२८० प्रति किलो
८ फेब्रुवारी (मंगळवार) चांदीचा दर ६३,४९० प्रति किलो
९ फेब्रुवारी (बुधवारी) चांदीचा दर ६३,८३० प्रति किलो
१० फेब्रुवारी (गुरुवार) चांदीचा दर ६४,१६० प्रति किलो
११ फेब्रुवारी (शुक्रवार) चांदीचा दर ६४,७५० प्रति किलो

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---