जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२४ । मागील गेल्या काही दिवसापासून सोन्यासह चांदी दरात वाढ दिसून येत आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात दोन्ही धातूंचे दर वाढल्याने ग्राहकांना मोठी झळ सोसावी लागत आहे. मात्र आज आज (मंगळवार), 08 ऑक्टोबर रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घट दिसून आली आहे.
सोन्याच्या किमतीत घसरण झालेली असली तरी सध्या सोन्याचा भाव 75 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव प्रतिकिलो 90 हजार रुपयांहून अधिक आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज दुपारी ३ वाजेपर्यंत सोन्याच्या किमतीत 200 रुपयापर्यंतची घसरण दिसून आली. यामुळे सोने 75,830 रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे. तसेच चांदी दरात तब्बल 1,428 रुपयांची घसरण दिसून आली. यामुळे एक किलोचा चांदीचा दर 90,900 रुपयावर व्यवहार करत आहे.
जळगावातही सोने चांदी दरात घसरण?
जळगाव सराफ बाजारात देखील सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. मात्र चांदी दरात वाढ दिसून आली. सोने दरात 400 रुपयाची घसरण होऊन 10 ग्रॅम सोन्याचा दर 76,200 रुपये इतका आहे. तर चांदी एक हजार रुपयांनी वाढून 94,000 रुपयावर पोहोचली आहे.