---Advertisement---
वाणिज्य

ग्राहकांसाठी शुभवार्ता : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोने-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी घसरली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२३ । मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम भारतीय सराफ बाजारात दिसून आला. मे आणि जून महिन्यासारखी जुलै महिन्यात स्वस्ताई नव्हती. सोने-चांदीचा (Gold Silver Rate) दर वाढला होता. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात सोने चांदीचा दर कुठवर जाणार याची चिंता खरेदीदारांना होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झालीय. 500 रुपयांनी तर चांदी 3,000 रुपयांनी घसरली. Gold Silver Price Today

gold silver 2 jpg webp webp

भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.

---Advertisement---

या आठवड्यात असा बदलला भाव
1 ऑगस्ट रोजी सोन्याने 150 रुपयांची उसळी घेतली.
2 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची घसरण झाली.
3 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी किंमती कमी झाल्या.
4 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही.
5 ऑगस्ट रोजी सोने 200 रुपयांनी वधारले.
22 कॅरेट सोने 55,300 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,310 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

चांदीचा दर काय?
गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, चांदीच्या किमतीच्याबद्दल बोलायचं झाल्यास ऑगस्ट महिन्यात चांदीने पहिल्याच दिवशी एक हजारांची उसळी घेतली. दुसऱ्या दिवशी भावात 700 रुपयांची घसरण झाली. 3 ऑगस्ट रोजी चांदीत आपटी बार झाला. किंमती 2300 रुपयांनी घसरल्या. 4 ऑगस्ट रोजी पुन्हा 200 रुपयांनी चांदी स्वस्त झाली.5 ऑगस्ट रोजी 300 रुपयांनी किंमती वधारल्या. एक किलो चांदीसाठी ग्राहकांना 75,100 मोजावे लागतील. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---