जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहे. कालच्या घसरणीनंतर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ दिसून आलीय.मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळच्या सत्रात आज सोने 280 रुपयांनी वाढले आहे. तर चांदी 569 रुपयांनी वधारली आहे. Gold Silver Price Today
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील आजचा सोने-चांदीचा दर?
भारतीय वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी आली आहे. भारतीय वायदा बाजारात सोन्याचा भाव काल घसरणीसह बंद झाला होता. मात्र आज वाढ झाली आहे. आज, वायदे बाजारात सकाळी 10.30 वाजता 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 280 रुपयांनी वाढून 50,464 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याचा दर आज 50,350 रुपये प्रति दहा ग्रॅमवर उघडला गेला. पण काही काळानंतर किमतीत वाढ दिसून आली.
तर दुसरीकडे आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरही चांदीचा भाव वधारताना दिसत आहे. चांदीचा दर आज 569 रुपयांनी वाढून 58,895 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा भाव 58,444 रुपयांवर उघडला गेला. एकदा किंमत 57,727 रुपयांवर गेली. पण नंतर चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली.
जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,800 रुपये इतका आहे. यापूर्वी हा दर 50,600 रुपये इतका होता. म्हणजेच एका दिवसात सोन्याच्या किमतीत 200 रुपयाची वाढ दिसून येतेय. दुसरीकडे चांदी दर सध्या 59,000 रुपयापर्यंत आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)