जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याचा दर पुन्हा घसरला आहे. दरम्यान, सोने जून महिन्यात 70 हजारांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज होता. मे महिन्याच्या सुरुवातीला 62,000 रुपयांचा टप्पा गाठणाऱ्या गाठल्यानंतर हा अंदाज खरा वाटत होता. मे महिन्याच्या मध्यंतरापासून सोन्यात मोठी घसरण झाली. सोने एकदम 60,000 रुपयांच्या खाली आले. चांदीतही घसरण झाली.
काय आहे आजचा जळगावातील दर?
जळगावात सध्या सकाळच्या सत्रात 10 ग्रॅम सोने 58,500 रुपये विनाजीएसटी रुपयांवर आला आहे. यापूर्वी गुरुवारी सकाळी सोन्याचा दर 58,700 रुपयावर होता. म्हणजेच त्यात 200 रुपयाची घसरण झालेली आहे.
1 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,930 रुपये होता. 10 जून रोजी सोन्याचा भाव 60,700 रुपये होता. त्यानंतर भाव घसरले. 15 जून रोजी सोने प्रति 10 ग्रॅम 59,820 रुपयांवर पोहचले. 28 जून रोजी सोन्याचा दर 59000 रुपयावर गेला होता. मात्र गेल्या दोन दिवसात घसरण होऊन सोन्याचा भाव 58,500 रुपयावर आला आहे.
तर दुसरीकडे एक किलो चांदीचे दरही खाली आले असून आता विनाजीएसटी 70,300 रुपयांना विकले जात आहेत. चांदीच्या किमतीत 200 रुपयाची घसरण झालेली पाहायला मिळतेय. यापूर्वी 21 जून रोजी एक किलो चांदी 73,000 रुपये होती. तर 25 जून रोजी हा भाव 69000 रुपये किलोवर आला होता.